कॅलगरी (कॅनडा) येथील एका शाळेची गांधीगिरी

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील कॅलगरी येथील एका शाळेने सर्वसमावेशकतेच्या नावाखाली मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या खाण्यावर बंदी लादली आहे. कॅलगरी येथील ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने रमझान महिन्यात उपवास करणार्या मुसलमान विद्यार्थ्यांना वाईट वाटू नये, असे कारण देत ‘कॅफेटेरिया’मध्ये (भोजनकक्षातील) अन्न सेवनावर बंदी घातली आहे. शाळा प्रशासनाच्या या आदेशानंतर उपवास न करणार्या तब्बल ९११ मुसलमानेतर विद्यार्थ्यांवरही दुपारच्या सुटीत उपाशी रहाणे किंवा खाण्यासाठी दुसरी जागा शोधणे भाग पडत आहे. या निर्णयाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून इतर मुलांवर धार्मिक प्रथा लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.
Is "Secularism" going too far in Canada? 🚩
A school in Calgary has restricted 9-year-old students from eating so as not to offend those fasting during Ramadan.
What starts as "equal respect" may be turning into a policy that challenges the roots of a progressive society.… pic.twitter.com/KH20m8u5DV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 18, 2026
१. पालकांना पाठवलेल्या अधिकृत ई-मेलमध्ये कॅफेटेरियातील भोजन क्षेत्र ‘अन्नमुक्त’ घोषित केल्याचे नमूद आहे. यामध्ये इयत्ता चौथीतील, म्हणजे अवघ्या ९ वर्षांच्या लहान मुलांचाही समावेश आहे.
२. दुसरीकडे इयत्ता ७ वी ते ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी तर पूर्ण १ तासाच्या सुटीत भोजनगृहात खाण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या कॅनडात कडाक्याची थंडी पडत आहे. अशा काळात हे अधिकच त्रासदायक ठरत आहे.
३. गंमत अशी की, इस्लामी रुढीनुसार रमझानचा उपवास बंधनकारक तेव्हा मानला जातो, जेव्हा मूल पौगंडावस्थेत, म्हणजे साधारण १३ ते १४ वर्षांचे होते; परंतु ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने या नियमात चौथीतील मुलांनाही समाविष्ट केले आहे, ज्यांचे वय केवळ ९ वर्षे आहे.
शिक्षण मंडळाची संदिग्ध भूमिका !
वाद वाढल्यानंतर कॅलगरी शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले; परंतु त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झाला. एका बाजूला ई-मेल पाठवल्याचे मान्य करण्यात आले, तर दुसर्या बाजूला जेवण्याच्या सुटीतील बंदीच्या नियमात कोणताही पालट करण्यात आलेला नाही.
संपादकीय भूमिकाकॅनडासारख्या सुधारणावादी समाजालाही सर्वधर्मसमभावाचा ज्वर चढला आहे, हेच यातून दिसून येते ! हा सर्वधर्मसमभाव तेथील समाजाच्या मुळावर उठल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !