
कोल्हापूर – जिल्ह्यात असलेल्या कागल तालुक्यातील करनूर गावातील ही घटना. एका व्हॉटस्अॅप गटात आलेल्या संदेशावरून धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करत धर्मांध मुसलमानांनी हिंदु युवकांना मारहाण केली, तसेच त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिसांच्या गाडीची काचही फुटली. वाद मिटवण्यासाठी आयोजित बैठकीत पुन्हा वाद झाल्याने हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही बाजूंच्या युवकांवर गुन्हे नोंद केल्याचे कळते. (एखादा संदेश जर आक्षेपार्ह वाटत असेल, तर त्या संदर्भात दाद मागण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीने दिलेले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करता येते. असे न करता धर्मांधांनी हिंदूंना मारहाण करणे आणि दगडफेक करणे म्हणजे धर्मांध कायदा जुमानत नसल्याचे लक्षण आहे ! अनेक ठिकाणी काही ना काही कारण काढून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करण्याची प्रकरणे वाढत असून पोलिसांनी अशा घटनांना आवर घालण्यासाठी तात्काळ योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
१. ‘बलीदान मासा’च्या निमित्ताने गावातील तरुणांच्या सामाजिक माध्यमांवरील गटात एक संदेश प्रसारित झाला होता. याला धर्मांधांनी आक्षेप घेत त्यावर अयोग्य भाषेत प्रत्युत्तर दिले. या संदर्भात जाब विचारण्यास गेलेल्या हिंदु तरुणांना मारहाण करण्यात आली.
२. ही घटना कळताच गावातील हिंदू एकत्र झाले आणि मारहाण करणारे जिथे लपून बसले होते, तिथे पोचले. या वेळी एका प्रार्थनास्थळातून हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. चौकात उभ्या असलेल्या काही दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर २ दिवस गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता.
पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यातील संभाषण !या संदर्भात अधिक माहिती देतांना हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे म्हणाले, ‘‘पोलीस प्रशासनास निवेदन देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ गेले होते. या वेळी पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणात हिंदु तरुणांनाच गुन्हेगार ठरवत ‘हिंदु तरुणांनी व्हॉट्सअॅपवर संदेश प्रसारित करण्याचे कारण काय ?’, असा प्रश्न उपस्थित केला. ‘या घटनेत पोलिसांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर ‘ते पोलीस पाहून घेतील’, असे उत्तर दिले. |
संपादकीय भूमिकावारंवार कुरापती काढून हिंदूंवर आक्रमण करण्याचा धर्मांधांचा वाढता उद्दामपणा ! |
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !