
मुंबई – चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात महिला दिनानिमित्त ‘महिला सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान झाले. सनातन संस्थेच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी व्याख्यानातून महाविद्यालयातील युवतींना संबोधित केले. या वेळी १२० युवती आणि प्राचार्या उपस्थित होत्या. प्रशिक्षक श्री. राज जाधव यांनी युवतींना स्वरक्षणाचे तंत्र शिकवले. समितीनिर्मित स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयीचे चलचित्र दाखवण्यात आले. त्यामुळे युवतींमध्ये आत्मिवश्वास वाढून त्यांनी असे प्रशिक्षण घेण्याची सिद्धता दर्शवली.
स्वसुरक्षेसाठी प्रशिक्षित होऊन स्वतःसह समाजाचे रक्षण करूया ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
आपल्या इतिहासात अनेक थोर, शूर, विचारवंत आणि कर्तृत्वावन स्त्रिया जन्माला आल्या आहेत. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, माता अहिल्यादेवी, तसेच आताच्या काळातील अंतराळवीर सुनिता विल्यम्स, सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे; परंतु सद्य:स्थिती पहाता महिलांच्या सुरक्षेची अत्यंत आवश्यकता आहे. प्रत्येक युवती आणि महिला यांनी स्वसरक्षणार्थ प्रशिक्षित झाले पाहिजे आणि समाजाचे रक्षण करायला हवे.
क्षणचित्रे
१. व्याख्यान ऐकून आणि स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके पाहून पुष्कळ विद्यार्थिनींनी प्रशिक्षण घेण्याची सिद्धता दर्शवली.
२. महाविद्यालयाच्या ४ प्राचार्यांनी ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होण्याविषयी इच्छा व्यक्त केली.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !