Chikhali Gorakshak Attack : चिखली (जिल्हा बुलढाणा) येथे मुसलमानांकडून गोरक्षकावर प्राणघातक आक्रमण !

  • गोमांसाचे ‘कंटेनर’ पकडून दिल्याच्या रागातून आक्रमण

  • ‘जशास तसे’ उत्तर देण्याची हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी

गोरक्षक ओमराजे मदनराजे गायकवाड

चिखली (जिल्हा बुलढाणा) – चिखली शहरात गेल्या ३ वर्षांपासून गोवंश हत्या रोखण्यासाठी सक्रीय असलेले गोरक्षक ओमराजे मदनराजे गायकवाड यांच्यावर काही समाजकंटकांनी जीवघेणे आक्रमण केले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे.

२१ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५.४५ वाजता ओमराजे गायकवाड घरी जात असतांना अस्मान खान, अकील खान आणि फरजान खान अनिस खान यांनी त्यांना अडवले. ‘तू गोरक्षक झाला आहेस का ? हिंदु-हिंदु करतोस का ?’, असे म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली, तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. त्यांना जिवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली. काही महिन्यांपूर्वी ओमराजे यांनी गोमांसाचे दोन ‘कंटेनर’ पकडून दिले होते. या रागातून आरोपींनी वरील प्रकार केला. (पोलीस गोरक्षकांना संरक्षण का पुरवत नाहीत ? गोरक्षकांवर आक्रमण झाल्याचे दायित्व पोलिसांवर निश्‍चित करून त्यांच्यावर कारवाई का होऊ नये ? – संपादक) ओमराजे यांनी वेळीच एका दुकानाचा आश्रय घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिंदु अस्मितेवरील प्रहार असल्याची हिंदुत्वनिष्ठांची टीका !

या घटनेवरून ‘हे केवळ एका व्यक्तीवरील आक्रमण नसून तो हिंदु अस्मितेवर झालेला प्रहार आहे’, असा अभिप्राय हिंदुत्वनिष्ठांनी दिला. गोरक्षकांना पोलीस संरक्षण मिळावे आणि आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) सारखी कठोर कारवाई करावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (हिंदूंनो, केवळ मागणी करून न थांबता उद्दाम धर्मांधांवर कारवाई होईपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्या ! – संपादक) ‘जशास तसे उत्तर दिले जाईल’, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली.
सध्या ओमराजे गायकवाड यांच्यावर उपचार चालू असून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दक्षता घेत आहेत.

संपादकीय भूमिका

  • वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार चिखलीत मुसलमानांची लोकसंख्या २४ टक्के होती. यामुळे गोरक्षकांवर अशी आक्रमणे व्हायला चिखली भारतात आहे कि पाकिस्तान अथवा बांगलादेशात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता आहे का ? अशी आक्रमणे होणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद नव्हे का ?
  • गोमांसाचे ‘कंटेनर’ पकडून द्यावे लागतात, यावरूनच महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात आहे कि नाही ? असाच प्रश्‍न पडतो. यासाठी उत्तरदायी असलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी चिखलीतील हिंदुत्वनिष्ठांनी आवाज उठवला पाहिजे !