|

म्हापसा, १० फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने विठ्ठलदासवाडा, मोरजी येथील समुद्रकिनार्याजवळील ‘रॉयल टॉमेटोस बीच साईड किचन अँड बार’ याला २ मासांसाठी टाळे ठोकण्याचा, तसेच पर्यावरण हानीभरपाई म्हणून २१ लक्ष रुपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे. वारंवार ध्वनीप्रदूषण करणार्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा संदेश याद्वारे मंडळाने दिला आहे.
मंडळाने दिलेल्या आदेशानुसार संबंधित नाईट क्लबने १ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ३५ वेळा दिवसाचे आणि ३५ वेळा रात्रीचे मिळून एकूण ७० वेळा ध्वनीप्रदूषण केले आहे. (प्रारंभीच कारवाई का केली नाही ? ३५ दिवस आणि ३५ रात्री ध्वनीप्रदूषण का होऊ दिले ? – संपादक) विशेष म्हणजे मंडळाने २१ जानेवारी या दिवशी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावूनही क्लबने ध्वनीप्रदूषण चालूच ठेवले. (२१ जानेवारीला नोटीस बजावूनही ५ फेब्रुवारीनंतर कारवाई करणार्या गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा असला कसला कारभार ? – संपादक) विशेष म्हणजे हा नाईट क्लब पर्यावरणदृष्ट्या अतीसंवेदनशील भागात आहे. हे कासवांचे अंडी घालण्याचे ठिकाण आहे. मंडळाच्या मते क्लबच्या व्यवस्थापनाकडे ‘व्यवसाय करण्याचा परवाना (‘कन्सेंट टू ऑपरेट’) नव्हता. मंडळाच्या मते संबंधित क्लबचे व्यवस्थापन सातत्याने नियमांचे उल्लंघन करते आणि कायद्याचा सन्मान करत नाही. मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या ध्वनीप्रदूषणासंबंधी निर्णयाच्या आधारे क्लबवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित क्लबला यापुढे व्यवसाय चालू करण्यासाठी ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक सुधारणा करणे, तसेच अग्नीशमन, वीज, पंचायत आणि अन्य शासकीय संस्था यांची अनुमती आणणे बंधनकारक असणार आहे. (अशा नाईट क्लब्सना काळ्या सूचीत टाकून त्यांना कधीच व्यवसाय करण्यास अनुमती देता कामा नये ! असे केले, तरच इतर क्लब्सना वचक बसेल ! – संपादक)
संपादकीय भूमिकाकासवांची अंडी घालण्याच्या ठिकाणी ३५ दिवस आणि ३५ रात्री ध्वनीप्रदूषण होऊ देणार्या गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळावरच कारवाई का करू नये ? |
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान