गडचिरोली येथे ७ जहाल नक्षली ठार !

मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आणि सैनिक यांचे कौतुक !

नागपूर – जिल्ह्यातील नक्षलविरोधी लढ्यात पोलिसांच्या सी-६० सैनिकांनी अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत राबवलेल्या मोहिमेमध्ये ७ जहाल नक्षलवादी ठार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेचे कौतुक करत सी-६० सैनिक आणि पोलीस यांचे अभिनंदन केले आहे. या यशस्वी मोहिमेत दुर्दैवाने एक सैनिक हुतात्मा झाला आहे. या सैनिकाला श्रद्धांजली अर्पण करून फडणवीस म्हणाले की, बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केलेले असतांनाही रणनीतीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी गोळी लागल्याने सैनिकाचा मृत्यू झाला. राज्यशासन हुतात्मा सैनिक कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेतली जाईल.