महाराष्ट्रात मे महिन्यात अवेळी पावसाचा जोर वाढणार !

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात ११ मेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज नोंदवला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दिवा आणि मुंब्रा येथील काही भागांत ८ घंटे पाणी बंद रहाणार; इ.व्ही.एम्. जिथे ठेवली आहेत, तिथे कडक पहारा !…

दिवा येथील शीळ, खर्डी आणि भोलेनाथनगर, तसेच मुंब्रा येथील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्नीशमन केंद्रापर्यंतच्या भागात ९ मे सकाळपासून १० मे सायंकाळपर्यंत ८ घंटे पाणीपुरवठा बंद रहाणार आहे.

विधान परिषदेच्या ४ मतदारसंघाच्या निवडणुका घोषित : १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी !

लोकसभेची निवडणूक ऐन भरात असतांना विधान परिषदेच्या २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्या आहेत. त्यासाठी १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी होईल.

नाशिक येथील शांतीगिरी महाराजांची वेगवेगळ्या उमेदवारांकडून भेट !

एम्.आय.एम्.चे इम्तियाज जलील, तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांनी शांतीगिरी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांना पाठिंबा मागितला आहे.

सिंधुदुर्ग ते भाग्यनगर आठवड्यातून ३ वेळा विमानसेवा

‘फ्लाय ९१’ या विमानसेवा देणार्‍या आस्थापनाने चिपी (जिल्हा सिंधुदुर्ग) ते भाग्यनगर (हैदराबाद) विमानसेवा चालू केली आहे. आठवड्यातून ३ वेळा ही सेवा उपलब्ध असणार आहे.

‘शेअर मार्केट’मधील लाभाचे आमीष दाखवून चिखली (पुणे) येथे पिता-पुत्रांकडून ४० जणांची फसवणूक !

१ कोटी १२ लाख २८ सहस्र रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार चिखली येथील पूर्णानगरमध्ये वर्ष २०१५ ते ५ मे २०२४ या कालावधीमध्ये घडला आहे.

‘इ.व्ही.एम्.’ची पूजा केल्याप्रकरणी रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !

रूपाली चाकणकर यांचे ‘इ.व्ही.एम्.’ची पूजा करतांनाचे एक छायाचित्र व्हायरल झाले होते.

निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर काजू बियांविषयीचे धोरण स्वीकारले जाणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

‘आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि काजूसोबत तेथील शेतकर्‍यांची मतेही आयात करा !’, असा फलक काजू बागायतदारांनी शहरात लावल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता मंत्री केसरकर बोलत होते.

मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ पासून, तसेच दुपारी १२ नंतरही कडक उन्हात अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी ५ पर्यंत ६३.७१ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झाले होते.

इ.व्ही.एम्. हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करणार्‍याला पुणे येथून अटक !

आरोपी मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे इ.व्ही.एम्. आहेत, ते सर्व ‘हॅक’ करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना भ्रमणभाष केला.