मायमराठीची शोकांतिका !
सध्या शाळांमधून उत्तम मराठी विषय शिकवणार्या शिक्षकांचाही अभाव आहे. मराठी शिकवणारे शिक्षकही पोटार्थी झाले आहेत. ‘मराठी भाषेतील वैविध्य, व्याकरणाचे सौंदर्य, मराठी भाषेची वैशिष्ट्ये मुलांच्या मनावर बिंबवून विद्यार्थ्यांना घडवायचे आहे, मराठी विषयाविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करायची आहे’, हा उदात्त विचार लयास गेला आहे.