कुंभक्षेत्री संतांनी उपस्थित केलेल्या राममंदिराच्या सूत्राला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून बगल

कुंभक्षेत्री झालेल्या एका कार्यक्रमात संतांनी उपस्थित केलेल्या राममंदिराच्या सूत्राला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बगल दिली.

आता काँग्रेसशासित छत्तीसगड राज्यातही सीबीआयला पूर्वानुमतीविना प्रवेशबंदी

तृणमूल काँग्रेस आणि आंध्रप्रदेश या राज्यांनंतर आता काँग्रेसशासित छत्तीसगड राज्य सरकारनेही सीबीआयला राज्यात पूर्वानुमतीविना प्रवेशबंदी केली आहे. सीबीआयला प्रवेशबंदी करणे म्हणजे गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी मोकळीक देणे !

(म्हणे) ‘राममंदिराप्रकरणी काँग्रेसची आडकाठी !’

आम्ही घटनात्मक मार्गाने राममंदिर उभारण्याचे आश्‍वासन दिले आहे. आम्हाला राममंदिर हवे आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लवकर पूर्ण व्हावी, असे आम्हाला वाटते. तथापि काँग्रेस यात आडकाठी करत आहे, असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला.

कुंभक्षेत्री साधू-संतांना करावा लागत आहे असुविधांचा सामना !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ‘कुंभक्षेत्री शासनाकडून मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवण्यात आल्या आहेत’, असे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात . . . . .

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांचे त्यागपत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीने १० जानेवारीला सीबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी केलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी ११ जानेवारी या दिवशी प्रशासकीय सेवेचे त्यागपत्र दिले.

पुणे विद्यापिठाच्या पदवीदान समारंभात पुणेरी पगडीमुळे वाद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पदवीदान सोहळ्यात पुणेरी पगडीला विरोध दर्शवत ४ विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या चारही विद्यार्थ्यांना कह्यात घेतले आहे.

ज्येष्ठ बासरीवादक पूजनीय पं. केशव गिंडे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित !

पं. पन्नालाल घोष यांच्या शिष्य परंपरेतील ज्येष्ठ बासरीवादक आणि विविध प्रकारच्या बासर्‍यांचे जनक अन् संशोधक पूजनीय डॉ. पं. केशव गिंडे यांना महाराष्ट्र शासनाच्या २०१८-१९ च्या जीवनगौरव पुरस्काराने १० जानेवारीला सन्मानित करण्यात …..

हिंदूंना त्यांच्या श्रद्धास्थानाचे प्रमाण द्यावे लागणे हे दुर्भाग्यपूर्ण ! – प्रशांत परब, प्रखर राष्ट्रप्रेमी

अनेक धर्मग्रंथ, पौराणिक स्थळे रामजन्मभूमीचे प्रत्यक्ष प्रमाण असताना हा वाद न्यायालयात जाणे अपेक्षित नव्हतेच. हिंदूंना त्यांच्या श्रद्धास्थानाचे प्रमाण द्यावे लागणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे मत प्रखर राष्ट्रप्रेमी श्री. प्रशांत परब यांनी येथे व्यक्त केले.

‘गूगल’वर ‘वाईट मुख्यमंत्री’ असा शोध घेतल्यास येते केरळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव !

‘गूगल’ या जगप्रसिद्ध ‘सर्च इंजिन’वर ‘वाईट मुख्यमंत्री’ (‘बॅड चिफ मिनिस्टर’), असा शोध घेतल्यास केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांचे नाव येत असल्याचे नुकतेच दिसून आले. ‘वाईट मुख्यमंत्री’ असे ‘सर्च’ केल्यास थेट विजयन् यांची माहिती ……


Multi Language |Offline reading | PDF