लवकरच होणार हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साम्यवाद स्वीकारल्यामुळे बंगाल आणि केरळ येथील हिंदूंची स्थिती केविलवाणी होणे

‘बंगाल आणि केरळ येथील हिंदूंनी ३० वर्षांहून अधिक काळ साम्यवाद स्वीकारला; म्हणून ते हिंदुत्वापासून दूर गेले. त्यामुळे त्यांच्यात धर्माभिमान उरला नाही. म्हणूनच ते सद्य:स्थितीत मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या आक्रमणांना तोंड देऊ शकत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी सद्य:स्थिती !

प्रत्येकाला ‘हिंदूंचे सर्व प्रश्‍न माझेच आहेत’, असे वाटेल, तेव्हाच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने हिंदूंची वाटचाल होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पाश्‍चात्त्य आणि हिंदु संस्कृती यांतील भेद !

‘पाश्‍चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती ‘स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची’, हे शिकवते.’

हिंदूंना ‘धर्म’ शिकवण्याची आवश्यकता !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांचे हित पहाणार्‍यांनाच मते देतात, तर हिंदू बुद्धीप्रामाण्यवाद, समाजवाद, साम्यवाद इत्यादी निरनिराळ्या विचारसरणींप्रमाणे मते देतात. त्यामुळे त्यांची मते फुटतात. त्यामुळे त्यांना भारतात किंमत उरली नाही ! हिंदूंना धर्म शिकवला, तरच त्यांची मते इतर धर्मियांप्रमाणे एकगठ्ठा होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्‍न पडतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहाते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाची निरर्थकता !

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले