भगवद्‌गीता कृतीत आणून हिंदु राष्ट्र स्थापा !

‘गीता केवळ शिकू नका, तर तिच्यातील शिकवण कृतीत आणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

हल्लीचे तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ या पाश्‍चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याचे पाप त्यांना जन्मोजन्मी भोगावेच लागणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच मिळणार हिंदूंना आधार !

‘पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कुणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीच्या पलीकडे असलेले सूक्ष्म जग !

‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ लढा !

‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करा !

‘आता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी सहस्रो डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे पाश्‍चात्त्यांची वेळकाढू संशोधनपद्धत, तर कुठे क्षणात कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देणारी भारतीय साधना !

‘पाश्‍चात्त्यांची संशोधनपद्धत आहे, ‘माहिती गोळा करा, तिचे सांख्यिकी विश्‍लेषण करा आणि मग निष्कर्ष काढा.’ याला अनेक वर्षे लागतात. याउलट साधनेत प्रगती झाली की, क्षणात जगातील कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मातील विज्ञानाचे सर्वश्रेष्ठत्व !

हिंदु धर्मातील विज्ञान ग्रहांच्या भौतिक माहितीसमवेत ‘ग्रहांचा परिणाम काय होतो ? कधी होतो ? आणि दुष्परिणाम होणार असले, तर त्यावर उपाय काय ?’, असे सर्व सांगते. आधुनिक विज्ञानाच्या सर्वच शाखांच्या संदर्भात असेच आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्‍वरप्राप्ती करून देणार्‍या संतांचे महत्त्व जाणा !

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वराची कृपा होण्यासाठी काय करावे ?

‘तन, मन, धन आणि अहं यांचा त्याग झाला अन् ईश्‍वराप्रती भाव अन् भक्ती वाढली की, ईश्‍वराची कृपा होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले