ईश्‍वरप्राप्ती ही पूर्णकालीन साधना !

‘ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, काळाप्रमाणे साधना पालटते, हे लक्षात घ्या !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्‍वरी राज्यात असे नसेल !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत अधोगतीच्या परमावधीला जाण्यामागील कारण !

‘पूर्वीचे राजे राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे आणि अरण्यात जायचे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकातरी शासनकर्त्याने असे केले आहे का ? त्यांच्यामुळेच भारत अधोगतीच्या परमावधीला गेला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे शाळांना लज्जास्पद !

‘विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खासगी शिकवण्या नव्हत्या.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद !

‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात इंग्रजी भाषा नसेल !

‘हिंदूंनो, हिंदु राष्ट्रात गुलामगिरी दर्शवणारी आणि रज-तमप्रधान इंग्रजी भाषा भारतात नसेल. राज्यांच्या भाषा प्रशासकीय भाषा असतील. त्यामुळे पुढे तुमच्या मुलाला ‘नोकरी मिळावी’, असे वाटत असल्यास त्याला आताच भारतीय राज्यभाषेत शिक्षण द्या.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘कोणत्याही गोष्टीचे मूळ कारण न शोधता त्यावर आधुनिक वैद्य, न्यायाधीश, सरकार इत्यादी सर्वच केवळ वरवरचे उपाय करतात. याउलट व्यष्टी आणि समष्टी प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, काळ इत्यादी मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यांवरील उपाय फक्त अध्यात्मच सांगू शकते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

व्यक्तीस्वातंत्र्यवाले आणि आध्यात्मिक साधना करणारे यांच्यातील भेद !

‘व्यक्तीस्वातंत्र्यवाले स्वेच्छेनुसार वागतात. त्यामुळे ते सुखी होतात, तर साधना करणारे प्रथम परेच्छेने आणि नंतर ईश्‍वरेच्छेने वागतात. त्यामुळे ते आनंदी होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धार्मिक कार्यासाठी सन्मार्गाने मिळवलेले धनच वापरावे !

‘एखाद्या धार्मिक संस्थेला कुणीतरी दिलेले पैसे पापाने मिळवलेले असल्यास ते व्यर्थ जातात, म्हणजे एखाद्या सेवेसाठी ते पैसे वापरले, तर त्या सेवेची फलनिष्पत्ती चांगली नसते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले