हिंदू धर्मनिष्ठाहीन झाल्याचा परिपाक !
‘हिंदूंची धर्मनिष्ठा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी नष्ट केल्यामुळे धर्मनिष्ठ अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदूंची धर्मनिष्ठा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी नष्ट केल्यामुळे धर्मनिष्ठ अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हल्लीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि धर्मद्रोह्यांना वाद-विवाद करून हरवता येत नाही; कारण त्यांचा धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसल्याने ते वाद-विवाद करण्यास पुढे येत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कुणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘धर्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे. असे असतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्माविरुद्ध विधाने करणे केवळ अज्ञानदर्शक नसून तो धर्मद्रोह आहे. एखाद्या शाळेतल्या मुलाने पदवीधरावर त्याच्या ज्ञानासंदर्भात टीका करावी, असे ते आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एखाद्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी तिची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, ती इतरांना कशा प्रकारे साहाय्य करते, हे आपल्याला कळले की, आपल्याला तिच्याविषयी आपुलकी वाटून तिच्याशी सहज बोलणे होते. हाच भाग देवतांची उपासना करतांनाही होतो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘साम्यवाद्यांची सर्वांत हास्यास्पद गोष्ट अशी की, त्यांच्यातही राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता असा भेद असतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘वैद्यकीय, अर्थ, न्याय इत्यादी सर्वच क्षेत्रांत सर्व जण तज्ञांचे ऐकतात; पण त्याहून सूक्ष्म असणार्या अध्यात्माच्या क्षेत्रात मात्र बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू स्वतःला अधिक शहाणे समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘शालेय शिक्षणात जीवनात सर्वांत उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
सध्याच्या काळात हिंदू धर्माचरण करत नाहीत आणि त्यांच्यामध्ये धर्माभिमानही नाही. त्यामुळे ‘येणार्या आपत्काळात तुमचे रक्षण होण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी साधना करा’, असे त्यांना सांगावे लागत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले