हिंदु राष्ट्रात भारतीय भाषांचे संवर्धन होईल !

‘स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली, तरी अजूनही ‘इंग्रजी भाषेची गुलामगिरी नष्ट करावी’, असे एकाही शासनकर्त्याला वाटत नाही. भावी हिंदु राष्ट्रात तामसिक इंग्रजी भाषेचे नव्हे, तर सात्त्विक संस्कृत भाषा आणि अन्य भारतीय भाषा यांचे संवर्धन अन् प्रसार केला जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी आणि साधक यांच्यातील भेद !

‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे प्राण्यांप्रमाणे स्वेच्छेने वागणारे, तर साधक म्हणजे परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणारे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांचे श्रेष्ठत्व !

‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांचे महत्त्व !

‘डॉक्टर फारतर व्याधी कमी करतात; पण मृत्यू टाळू शकत नाहीत. याउलट संत जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनच मुक्त करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परिपूर्ण हिंदु धर्म !

‘हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अद्वितीय हिंदु धर्म !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलिसांना नीती आणि धर्म शिकवा !

पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वधर्मसमभावी हिंदूंसाठी हे लज्जास्पद !

‘जात्यंधता, सर्वधर्मसमभाव आणि बुद्धीप्रामाण्यवाद यांच्या आहारी गेलेल्या हिंदूंनी स्वातंत्र्यानंतर प्रगती केली आहे, असे एकतरी क्षेत्र आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखेच !

‘पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे ज्ञान देणारे सूक्ष्मातील काहीतरी आहे, हे ज्ञात नसल्याने विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखे असते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे धर्मद्रोही !

धर्म बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्म समजून न घेता धर्मावर टीका करणे, हा धर्मद्रोहच आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले