अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत !

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंभाव असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अहंभावशून्य भगवंत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वास्तविक ‘दूरदर्शीपणा’ !

‘स्वसुखासाठी दुसर्‍यांना दुःख देऊन धनाचा संग्रह करणे, हे पाप आहे; पण भविष्यकाळ लक्षात घेऊन त्यासाठी आपली उचित अशी तयारी योग्य प्रकारे करून ठेवणे याला ‘दूरदर्शीपणा’ म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना हे लज्जास्पद नव्हे का ?

‘कुठे ʻविश्‍वचि माझे घर’, असा भाव असलेले संत, तर कुठे बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूही आपले न वाटणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत नेहमीच शत्रूंकडून मार खातो, यामागील कारण !

‘पाकिस्तान्यांकडून वारंवार आक्रमणे होत असतांना ‘आक्रमण करणे’ हेच स्वरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे (Attack is the best policy of defence), हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही सरकारला ज्ञात नाही; म्हणून भारत आणि हिंदूही नेहमी शत्रूंकडून मार खातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान निरनिराळे ग्रह-तारे यांचा आकार, पृथ्वीपासूनचे अंतर इत्यादी माहिती सांगते, तर ज्योतिषशास्त्र ग्रह-तारे यांचा परिणाम आणि परिणाम वाईट होणार असल्यास त्यांवरील उपायही सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वाहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान प्राण्यांच्या स्थूलदेहाची माहिती सांगते. याउलट कोणत्या प्राण्यांत कोणत्या देवतेचे तत्त्व आहे इत्यादी माहिती अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

वास्तूचे व्यक्तीवर रात्रंदिवस परिणाम होतात. हे ज्ञात नसल्यामुळे आधुनिक वास्तूशास्त्रज्ञ केवळ हवा, उजेड आणि दिसायला वास्तू कशी दिसेल, यांचाच विचार करतात. याउलट धर्मात वास्तू कशी असली की, तिच्यामुळे त्रास होणार नाही, उलट तिच्यामुळे साधना करण्यास पूरक वातावरण मिळेल, याचा विचार केलेला असतो.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले