गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !

गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराची तत्सम काही भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते ?

आंब्याच्या पानाचे महत्त्व

इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात.

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी !

ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी.

कडूलिंबाच्या पानाचे महत्त्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत-संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) अन् वसंत ऋतू चालू होतो.

गुढीपाडव्याची प्राचीनता सांगणार्‍या काही कथा

नारद मुनींना ६० मुलगे झाले. प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आणि प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस देवांनी गुढ्या-पताका उभारून आनंदोत्सव साजरा केला.

हिंदूंची आणि अन्य पंथियांची कालगणना

हिंदूंची प्राचीन काळापासून चालत आलेली भारतीय कालगणना गुढीपाडव्यापासून चालू होते. वर्षातील प्रत्येक अमावास्येला चंद्र-रवि एकत्र येत असतात आणि पौर्णिमेस ते समोरासमोर येतात. चैत्र अमावास्येस चंद्र आणि रवि दोघेही मेष म्हणजे पहिल्या राशीत एकत्र असतात.

गुढीपाडव्याविषयी महाभारतातील उल्लेख

महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंंभीच्या दिवशी तिची पूजा केली.

गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाची सात्त्विक रांगोळी

सनातनचा लघुग्रंथ ‘देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या’

हिंदु संस्कृतीची प्राचीनता !

२०२० या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२२ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.