गुढीपाडव्याची प्राचीनता सांगणार्‍या काही कथा

नारद मुनींना ६० मुलगे झाले. प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आणि प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस देवांनी गुढ्या-पताका उभारून आनंदोत्सव साजरा केला.

हिंदूंची आणि अन्य पंथियांची कालगणना

हिंदूंची प्राचीन काळापासून चालत आलेली भारतीय कालगणना गुढीपाडव्यापासून चालू होते. वर्षातील प्रत्येक अमावास्येला चंद्र-रवि एकत्र येत असतात आणि पौर्णिमेस ते समोरासमोर येतात. चैत्र अमावास्येस चंद्र आणि रवि दोघेही मेष म्हणजे पहिल्या राशीत एकत्र असतात.

गुढीपाडव्याविषयी महाभारतातील उल्लेख

महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंंभीच्या दिवशी तिची पूजा केली.

गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाची सात्त्विक रांगोळी

सनातनचा लघुग्रंथ ‘देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या’

हिंदु संस्कृतीची प्राचीनता !

२०२० या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२२ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.

भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला सात्त्विक वातावरणात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक !

‘भारतीय परंपरेनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ होय ! या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून, गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत केले जाते.