Abdullah Azam Khan : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या मुलाला ७ वर्षांची शिक्षा !

बनावट पारपत्राचे प्रकरण

अब्दुल्ला आझम आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान

रामपूर (उत्तरप्रदेश) – खोटी कागदपत्रे सादर करून दोन स्वतंत्र पारपत्र मिळवून त्याचा अपवापर केल्याच्या प्रकरणी रामपूर येथील न्यायालयाने समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यास ७ वर्षांची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी रामपूरमधील भाजपचे नेते आकाश सक्सेना यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

जन्मदिनांक पालटण्याच्या संदर्भातील ही त्याची तिसरी शिक्षा आहे. अनुमाने १५ दिवसांपूर्वी एका प्रकरणात आझम खान आणि अब्दुल्ला आझम या दोघांनाही ७ वर्षांची शिक्षा झाली होती. दोन जन्मनोंदींच्या अन्य एका प्रकरणातही वर्ष २०२३ मध्ये त्यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या दोघेही रामपूर कारागृहात आहेत.