|

भुवनेश्वर (ओडिशा) – दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना भारतात आश्रय देणारी आणि त्यांच्याकडून गैरकृत्ये करवून घेणारी टोळी उघड केली. या टोळीचा मुख्य सूत्रधार सिकंदर आलम उपाख्य सिको याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. सिकोचा धाकटा भाऊ अब्दुल मोतालीफ खान उर्फ टिकी यालाही खोरधा येथे अटक करण्यात आली आहे.
१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकोने घुसखोरांना जगतसिंहपूर जिल्ह्यातील बहरामपूर येथे सरकारी भूमीवर झोपड्या बांधून दिल्या होत्या. (पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! एवढे अवैध बांधकाम होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्यास त्यात चुकीचे ते काय ! – संपादक) पोलिसांनी धाड घातल्यानंतर झोपडपट्टीत रहाणारे सुमारे ३० बांगलादेशी नागरिक पळून गेले.
२. पोलीस त्यांच्याही शोधात आहेत. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत सरकारी भूमीवरील ही अवैध बांधकामे हटवली. यात सिकोचे १० खोल्यांचे पक्के घर आणि ७ झोपड्यांचा समावेश आहे.
३. पोलिसांनी सिकोच्या घरातून ५ तलवारी, १ बंदूक आणि ७ धारदार शस्त्रे जप्त केली. बांगलादेशी घुसखोरांचे हे अवैध जाळे चालवण्यासाठी सिकोला परदेशातून निधी मिळत होता का, याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत.
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र
Panchkula Bomb Threat : पंचकुला (हरियाणा) महापौर कार्यालयासह हरियाणा आणि देहलीतील मंदिरे बाँबने उडवण्याची धमकी
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !