‘सोलापूर येथील एक हितचिंतक मागील १० वर्षांपासून ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक आहेत. त्यांनी सनातनला वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

१. त्यांच्याकडे ग्राहक म्हणून आलेल्या एका जिज्ञासूला त्यांनी स्वतःहून सनातन संस्थेच्या कार्याविषयी सांगितले. हितचिंतकांनी त्या ग्राहकाला सांगितले की, ‘मी सनातनच्या कार्याने भारावून गेलो आहे. सनातन संस्थेचे साधक तन-मनाचा त्याग करून सेवा करतात !’ त्या ग्राहकानेही लगेच त्यांच्याकडील साहित्य अर्पण म्हणून सनातन संस्थेला देण्याची सिद्धता दर्शवली आणि साहित्य घेऊन जाण्यासाठी साधकांना बोलावले.

२. त्या हितचिंतकांनी त्यांच्या चार मित्रांनाही संपर्क केला आणि ‘‘सनातनचे कार्य चांगले आहे’’, असे सांगितले. भ्रमणभाषवरून त्यांना संबंधित माहितीपत्रक (ब्रोशर) पाठवले.
३. नंतर हितचिंतकांनी साधकांना सांगितले, ‘‘माझे दोन मित्र काही कामानिमित अमेरिकेत गेले आहेत. ते १ – २ आठवड्यांत परत येतील. तेव्हा तुम्ही त्यांना भेटण्यासाठी या !’’
– सौ. वर्षा वैद्य, कुमठा नाका, सोलापूर. (३१.१.२०२५)
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !