आधुनिक वैद्य पोलिसांच्या कह्यात

पणजी, १२ सप्टेंबर (वार्ता.) – अतीदक्षता विभागात (‘आयसीयु’मध्ये) भरती असलेल्या एका स्पॅनिश महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली जुने गोवे पोलिसांनी ‘हेल्थवे’ रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी आधुनिक वैद्य डॉ. व्ही. दोशी यांना सांगली येथून कह्यात घेतले आहे. ३१ ऑगस्ट या दिवशी ही घटना घडली होती आणि याविषयी १० सप्टेंबर या दिवशी तक्रार करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेमुळे रुग्णांची सुरक्षितता आणि डॉक्टरांचे गैरवर्तन रोखणे यांसाठी कठोर नियमावलीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पीडिताच्या बहिणीने जुने गोवे पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार केली आहे. तक्रारीमध्ये संबंधित संशयित प्रशिक्षणार्थी डॉक्टरने महिला रुग्णाला अनेक ठिकाणी अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. जुने गोवे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली डॉ. दोशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसात तक्रार झाल्यानंतर ‘हेल्थवे’ रुग्णालयाने तातडीने डॉ. दोशी यांना निलंबित केले आहे.
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
कोंढवा (पुणे) येथे मुसलमान फैयाजने केला सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा विनयभंग !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट