२१ जणांविरुद्ध गुन्हे नोंद

जत (जिल्हा सांगली) – तालुक्यातील दरिबडची येथे विसर्जन मिरवणुकीत मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘शिवशक्ती’ आणि ‘बालमित्र’ या गणेशोत्सव मंडळांतील २१ जणांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस नाईक अर्जुन घोदे यांनी या संदर्भात तक्रार केली आहे.
दरिबडची येथील विसर्जन मिरवणुकीत रात्रीची अनुमती संपल्यानंतरही गणेशोत्सव मंडळांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि वाद्य वाजवणे चालूच ठेवले होते. त्यामुळे मिरवणुका जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवून अवैध जमाव जमवला. जिल्हा दंडाधिकारी सांगली आणि पोलीस अधीक्षक यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे हे स्पष्ट उल्लंघन असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
घरपट्टीच्या नोटिसीतील जाचक अटी आणि कालमर्यादा रहित करावी ! – ‘व्यापारी एकता असोसिएशन’ची मागणी
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक