१ सहस्र वर्षांपूर्वीचे सोमनाथाचे शिवलिंगाचे घेतले भावपूर्ण दर्शन !

सोरटी सोमनाथ येथील १ सहस्र वर्षांपूर्वीचे मूळ शिवलिंग दाखवताना श्री. दर्शक हाथी

फोंडा (सच्चिदानंद परब्रह्मनगरी), १७ मे (वार्ता.) – या कार्यक्रमाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे प्रतिनिधी म्हणून श्री. दर्शक हाथी हे उपस्थित होते. या वेळी श्री. दर्शक हाथी यांनी त्यांच्या समवेत सोरटी सोमनाथ येथील १ सहस्र वर्षांपूर्वीचे मूळ शिवलिंग उपस्थित संत आणि वक्ते यांना दाखवण्यासाठी व्यासपिठावर आणले होते. या वेळी श्री. दर्शक हाथी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना हे शिवलिंग दाखवले.

शिवलिंगाचे वैशिष्ट्य उत्स्फूर्तपणे गुरुदेवांना माहिती देणारे श्री. चव्हाणके, तसेच त्याविषयी जिज्ञासेने जाणून घेणारे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत !

सोरटी सोमनाथाचे शिवलिंग त्या काळी चुंबकीय ऊर्जेमुळे आधांतरी रहात असे. शिवलिंगाचे व्यासपिठावर आगमन झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासह व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांनी त्याचे दर्शन घेतले. त्या वेळी सुदर्शन वाहिनीचे प्रमुख श्री. सुरेश चव्हाणके यांनी उत्स्फूर्तपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्याविषयीची माहिती सांगितली आणि चुंबकीय ऊर्जेचे प्रात्यक्षित तिथे करून दाखवण्यास सांगितले. गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनीही या वेळी शिवलिंगाचे हे वैशिष्ट्य जिज्ञासेने भावपूर्णरित्या समजून घेतले.