वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Teump) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपातून अमेरिकेत पाकिस्तानी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आसिफ मर्चंट (वय ४६ वर्षे) असे त्याचे नाव आहे. आसिफ मर्चंट याने वर्ष २०२० मध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अमेरिकी नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता. ही माहिती समोर आल्यानंतर अमेरिकी सरकारने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अधिकारी यांची सुरक्षा वाढवली आहे.
अमेरिकेला जाण्यापूर्वी आसिफ मर्चंट अनेक दिवस इराणमध्ये राहिला होता. एप्रिलमध्ये पाकिस्तानातून अमेरिकेत पोचला होता. येथे पोचल्यानंतर त्याने न्यूयॉर्कमध्ये हत्येसाठी गुंड शोधण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिकापाकिस्तानी नागरित जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी ते तेथील समाज आणि राजकारणी यांच्यासाठी धोकादायक असतात, याचे उदाहरण ! |