Sarsanghchalak & Yogi Adityanath Meet : उद्या सरसंघचालक आणि योगी आदित्यनाथ यांची भेट होणार !

डावीकडून योगी आदित्यनाथ आणि प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तरप्रदेशाचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची १५ जून या दिवशी भेट घेणार आहेत. दोघांची ही भेट गोरखपूरमध्येच होणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीनंतर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. यात राज्यात संघाचा विस्तारासह अन्य सूत्रांवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.