वक्फ मंडळ बळकटीकरणाच्या काँग्रेसच्या आश्‍वासन पूर्ततेसाठी महायुतीकडून १० कोटी रुपयांचे प्रावधान (तरतूद) !

मुंबई, १० जून (वार्ता.) – वर्ष २००७ मध्ये महाराष्ट्रात तत्कालीन काँग्रेस सरकारने वक्फ मंडळासाठी अनुदान देण्याचे आश्‍वासन केंद्र सरकारला दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता करून वक्फ मंडळ बळकट करण्यासाठी सध्याच्या महायुती सरकारने वर्ष २०२४-२५ साठी १० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे. यातील २ कोटी रुपये महायुती सरकारने १० जून या दिवशी संमत केले आहेत.

केंद्रात काँग्रेसचे सरकार असतांना वर्ष २००७ मध्ये वक्फ भूमीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली होती. जून २००७ मध्ये या समितीचे सदस्य महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कामकाज, तसेच वक्फ मंडळाची मालमत्ता यांची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. या वेळी महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने वक्फ मंडळाला अनुदान देण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसने हे अनुदान दिले होते, तरीही महायुतीकडून हे अनुदान देण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या जागा बळकावणार्‍या वक्फ मंडळाचे बळकटीकरण हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी करणे हिंदूंना अपेक्षित नाही !