सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मनक्षत्राच्या प्रारंभ दिनाच्या पूर्वसंध्येला वातावरणात गुलाबी रंगाची उधळण !

नागेशी 
श्री. सागर निंबाळकर

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उत्तराषाढा हे जन्मनक्षत्र २७.५.२०२४ या दिवशी सकाळी १० वाजून १४ मिनिटांनी चालू होणार होते. त्याच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच २६.५.२०२४ या दिवशी सायंकाळी ७ ते ७.२५ या वेळेत आकाश आणि तेथील परिसर गुलाबी रंगात न्हाऊन निघाला होता. या निवासस्थानाच्या भिंतींचा रंग पांढरा आहे; मात्र तोही गुलाबी दिसत होता. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेली ही प्रीतीरूपी गुलाबी रंगाची उधळण, म्हणजे सृष्टीला झालेला आनंदच म्हणावा लागेल ! ‘सृष्टीही ज्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यास आतुर असते, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे गुरु म्हणून लाभल्याबद्दल आम्हा सर्व साधकांकडून गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’, असाच भाव या वेळी प्रत्येक साधकाच्या मनी दाटून आला.’  श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या नागेशी येथे सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत होत्या.

– श्री. सागर निंबाळकर, रामनाथी. गोवा. (२७.५.०२४)