सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार नामजप केल्यावर रात्री झोपेत घोरण्याचा त्रास बंद होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘जानेवारी २०२३ मध्ये मी झोपल्यावर घोरण्याचा मोठा आवाज यायचा. त्यामुळे माझ्या शेजारी झोपणार्‍या सहसाधकाने ‘झोपमोड होते’, अशी अडचण सांगितली. तेव्हा मी ‘डाव्या कुशीवर झोपणे’ यासारखे प्राथमिक उपाय योजल्यावर घोरण्याचा आवाज तात्पुरता बंद होत असे. नंतर मी आध्यात्मिक स्तरावरील उपाय, म्हणून सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप एकापाठोपाठ एक अशा प्रकारे १ घंटा (तास) केला. त्याच दिवसापासून झोपल्यावर माझे घोरण्ो बंद झाले. पुढे प्रतिदिन सलग काही दिवस वरील नामजप केल्यावर माझा घोरण्याचा त्रास पूर्णतः बंद झाला. त्यामुळे माझ्याकडून मनोमन भगवान श्रीकृष्ण, श्री गणेश, भगवान आणि शिव, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

श्री. गिरिधर वझे

पूर्वीच्या काळी ‘झोपेत वाईट स्वप्ने पडणे, एखादी वस्तू हरवणे’ यांसारख्या त्रासांवर उपाय म्हणून ऋषिमुनींनी काही श्लोकांची रचना केली. त्या त्या श्लोकांचे ठराविक संख्येत कर्मकांडांतर्गत नियम पाळून भावपूर्ण पठण केल्यावर संबंधित ऋषिमुनींच्या संकल्पामुळे ठराविक अडचण दूर होते. सध्याच्या किलयुगात नामजप ही सर्वाेत्तम साधना असून त्याला कर्मकांडाचे नियम लागू नाहीत. त्यामुळे सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी सांगितलेले नामजप भावपूर्ण केल्याने विविध विकार आणि त्रास दूर होतात, अशा अनुभूती श्रद्धावान साधकांना येतात. थोडक्यात, ‘सध्याच्या कलियुगात पृथ्वीतलावरील श्रद्धावंत साधकांना विविध विकारांच्या निर्मूलनासाठी स्वतःची संकल्पशक्ती कार्यरत करून वेगवेगळे नामजप सांगणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका, म्हणजे श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी घडवलेले एक थोर ऋषीच आहेत, असे वाटते.’

– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक