हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्याकडून समितीचे रत्नागिरी येथील कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे !

श्री. रमेश शिंदे यांच्याविषयी एका ‘हॉटेल’ व्यावसायिकाचा भाव !

‘रत्नागिरीत एका ‘हॉटेल’च्या सभागृहामध्ये पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेनंतर श्री. रमेश शिंदे यांना त्या ‘हॉटेल’चे मालक आवर्जून भेटायला आले. ते म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्यांचे पाय माझ्या वास्तूला लागले, हे आमचे भाग्य आहे.’’ तेव्हा रमेशदादांनी त्यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट दिला.’

– श्री. संजय जोशी, रत्नागिरी (२८.८.२०२३)

‘हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी दिलेल्या योगदानाबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अन् लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते २५.६.२०२३ या दिवशी नोएडा (उत्तरप्रदेश) येथे त्यांना ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संदर्भात त्यांचा सार्वजनिक सत्कार, व्याख्याने आणि पत्रकार परिषद यांचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि आयनी (तालुका खेड) येथे करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना श्री. रमेश शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली अन् त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(भाग २)

श्री. रमेश शिंदे

१ अ. श्री. संजय जोशी, रत्नागिरी

१ अ ४. श्री. रमेश शिंदे यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

१ अ ४ अ. श्री. शिंदे यांनी श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्यासह श्री सरस्वतीदेवीला प्रार्थना करून विषय मांडल्याने श्रोते प्रभावित होणे : ‘रमेशदादा मांडत असलेल्या विषयांमुळे श्रोते प्रभावित होतात. याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘मी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासह श्री सरस्वतीदेवीला प्रार्थना करून मगच विषयाला आरंभ करतो.’’

१ अ ४ आ. ‘त्यांना वाग्देवतेचा आशीर्वाद आहे’, हे ते मांडत असलेला विषय ऐकतांना जाणवते.

१ अ ४ इ. श्री. शिंदे यांच्यात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवणे : दादांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवते. ‘त्यांच्या समवेत सेवा करतांना मनावर ताण न येता मन सकारात्मक रहाते’, असे मला जाणवले. दादांनी ‘रत्नागिरी येथील पत्रकार परिषद झाल्यावर चिपळूण येथे पत्रकार परिषद घेऊया’, असे सुचवल्यावर कार्यकर्त्यांच्या मनात त्याविषयी साशंकता होती; मात्र त्यांचे दादांशी बोलणे झाल्यावर ते सकारात्मक झाले आणि त्यांनी प्रयत्न केले; परिणामी चिपळूण येथील पत्रकार परिषद फलनिष्पत्तीच्या दृष्टीने पुष्कळ प्रभावी अन् परिणामकारक झाली.

१ अ ४ ई. ‘श्री. शिंदे बाह्यतः अनेक कृती करत असूनही आतून ईश्वराच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवणे : दादांचे रत्नागिरी जिल्ह्यात सलग ३ दिवस कार्यक्रम होते. ‘व्याख्यान, गटचर्चा, समाजातील व्यक्तींशी अनौपचारिक बोलणे, कार्यकर्त्यांशी बोलणे’ इत्यादी प्रत्येक कृती ते शांतपणे आणि स्थिर राहून करत होते. ‘बाह्यतः ते सर्व कृती करत होते; मात्र आतून त्यांचे ईश्वराशी अनुसंधान टिकून आहे’, असे मला जाणवत होते.’

१ आ. श्री. विनोद गादीकर, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. 

१ आ १. इतरांचा विचार करणे : ‘श्री. रमेशदादा प्रवासात असतांना ‘ते रत्नागिरीला किती वाजेपर्यंत आगगाडी स्थानकावर पोचणार ?’, याची अद्ययावत् माहिती देत होते. त्यामुळे आगगाडी स्थानकावर जाऊन त्यांना घेऊन येणार्‍यांना वाट पहात बसावे लागले नाही.

१ आ २. लहान मुलांनाही आपलेसे करणे : रमेशदादांचा निवास एका हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांच्या घरी होता. त्या हिंदुत्वनिष्ठांचा एक ५ वर्षांचा भाचा रमेशदादांच्या निवासाच्या खोलीत येऊन मस्ती करत होता. त्या वेळी त्याला न ओरडता त्यांनी त्याच्याशी बोलणे चालू केले. तेव्हा तो लहान मुलगा मस्ती करणे सोडून रमेशदादांशी बोलू लागला. या प्रसंगातून ‘दादा मोठ्या वयाचे विद्वान लोक, समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती यांच्याशी तर जवळीक करतातच; पण ते लहान मुलांनासुद्धा आपलेसे करतात’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर संध्याकाळी हा छोटा मुलगा रमेशदादांच्या व्याख्यानाला आला होता.

१ आ ३. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्साहाने, आनंदाने आणि समर्पक उत्तरे देणे : रमेशदादांनी रत्नागिरीतील व्याख्यानात अभ्यासपूर्ण विषय मांडल्यानंतर व्यासपिठासमोर बैठक झाली. त्या वेळी २५ हिंदुत्वनिष्ठ दीड घंट्यापेक्षा अधिक वेळ विविध विषयांवर प्रश्न विचारून दादांकडून माहिती घेत होते. तेव्हा दादा त्यांना तेवढ्याच उत्साहाने, आनंदाने आणि समर्पक उत्तरे देत होते. दादांनी दिलेल्या उत्तरांमुळे हिंदुत्वनिष्ठांच्या मनातील शंकांचे समाधान झाले. शेवटी ‘आता बैठक थांबवूया’, असे सांगावे लागले.’

१ इ. डॉ. हेमंत चाळके आणि श्री. सुरेशशिंदे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. 

१ इ १. श्री. शिंदे यांचे मार्गदर्शन आणि त्यानंतर झालेली गटचर्चा यांमुळे प्रभावित झालेले हिंदुत्वनिष्ठ कृतीशील होणे : ‘चिपळूण येथे रमेशदादांचे हिंदुत्वनिष्ठांसाठी मार्गदर्शन झाले. मार्गदर्शनानंतर झालेल्या गटचर्चेत दादांचे बोलणे सहज आणि संवाद साधणारे असल्याने गटचर्चाही प्रभावी झाली. हे मार्गदर्शन आणि त्यानंतर झालेली गटचर्चा यांमुळे समितीच्या कार्याला गती मिळाली, हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समाजापर्यंत पोचवण्याविषयी हिंदुत्वनिष्ठ कृतीशील झाले आणि त्यांचे कृतीस्तरावरील चिंतन चालू झाले.

१ इ २. युवकांना सूत्रे मांडण्यास उद्युक्त करणे : दादांनी युवकांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे धाडस युवकांमध्ये अल्प असल्याचे लक्षात आले. त्या वेळी ‘बोलण्याचे महत्त्व आणि न बोलण्यामागील मनातील भीती’, यांविषयी त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ‘सूत्र सांगून सोडून दिले’, असे दादांनी केले नाही, तर ‘त्याचे महत्त्व आणि उपाय’, हेसुद्धा सांगितले. त्यामुळे युवकांनी सूत्रे मांडण्याचा पुन्हा प्रयत्न केला.

१ इ ३. एकच विषय विविध ठिकाणी नावीन्यपूर्ण मांडण्याचे कौशल्य : रत्नागिरी येथे दादांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’विषयी पत्रकार परिषद झाली. तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर दादांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद आयोजित करायला सांगितली. तिचे निमंत्रण द्यायला गेल्यावर पत्रकारांनी ‘रत्नागिरी येथे हा विषय झाला, मग चिपळूणला पुन्हा त्याविषयी वेगळे काय असणार ?’, असे सूत्र मांडले. चिपळूण येथे हलाल अर्थव्यवस्थेविषयीच्या व्याख्यानात दादांनी ‘हलालमुक्त गणेशोत्सव अभियान चालू होईल’, हा विषय मांडला. पत्रकार परिषदेत दादांनी त्या अनुषंगाने जी सूत्रे मांडली, ती ऐकल्यावर विषयाचे गांभीर्य पत्रकारांच्या लक्षात आले आणि त्यांनी दादांशी प्रदीर्घ चर्चाही केली.

१ इ ४. ‘कार्यकर्र्त्यांची सेवा आणि साधना व्हावी’, यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे : ‘काळानुसार प्रसारपद्धतीत कसे पालट करायला हवेत ? समाजातील हिंदूंना राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कृतीप्रवण कसे करावे ?’, याविषयी त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले अन् कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी साधनेच्या दृष्टीने करायच्या प्रयत्नांविषयी विस्तृतपणे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातील शंकांचे निरसन होऊन प्रसार करण्यासाठी त्यांना दिशा मिळाली आणि त्यांच्यात उत्साह निर्माण झाला.’

१ ई. श्री. विश्वनाथ पवार, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

१ ई १. अभ्यासू वृत्ती : ‘रमेशदादा आमच्या घरी २ दिवस रहायला होते. त्या वेळी त्यांच्या खोलीतील पटलावर काही आध्यात्मिक ग्रंथ ठेवले होते. ते व्यस्त असतांनाही त्यांनी त्यांतील १ ग्रंथ लगेचच वाचला.

१ ई २. पत्रकार परिषद परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न करणे : चिपळूण येथे दादांचे व्याख्यान झाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी ‘हलालमुक्त गणेशोत्सव अभियान’ राबवायचे ठरवले. त्याच्या पत्रकार परिषदेच्या आधी दादांनी ‘कुणी कोणते सूत्र मांडले, तर ते परिणामकारक होईल ?’, हे सांगितले.’

१ उ. सौ. विशाखा पवार, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

१ उ १. प्रेमभाव : ‘रमेशदादा आमच्या घरी निवासाला होते. त्यांनी त्यांच्या व्यस्ततेतही घरातील सर्व सदस्यांची आपुलकीने विचारपूस केली, तसेच ‘मी तुम्हाला घरामध्ये काही साहाय्य करू का ?’, अशी विचारणा करून साहाय्यही केले.

१ उ २. दिवसभराचे नियोजन व्यस्ततेचे असूनही सतत हसतमुख आणि प्रसन्न असणे : दादांचे दिवसभराचे नियोजन व्यस्ततेचे असते. ‘समाजातील विविध कार्यक्रमांत विविध पद्धतींनी विषयांची मांडणी करणे, प्रत्येक भागातील राहणीमान, वातावरण, लोकांची वेगवेगळी मानसिकता इत्यादी विविध परिस्थितीशी जुळवून घेणे’, हे सर्व करतांना त्यांना ताण आला आहे’, असे मला कधीही जाणवले नाही. ते सतत हसतमुख आणि प्रसन्न असतात.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

(सर्व सूत्रांचा दिनांक : २८.८.२०२३)