वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका ‘कॉपी पेस्ट’ !
पुणे – ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’ या संस्थांची ‘संशोधन छात्रवृत्ती’ (पीएच्.डी. फेलोशिप) मिळवण्यासाठी २४ डिसेंबर या दिवशी पात्रता परीक्षा झाली; परंतु या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका ‘कॉपी पेस्ट’ केल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे विद्यापिठाच्या ‘सेट’ विभागासह ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’ या संस्थांच्या परीक्षेचा दर्जा आणि विश्वासार्हता यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (असा अक्षम्य निष्काळजीपणा करणार्या संबंधित कर्मचार्यांचे निलंबन करणे आवश्यक ! – संपादक)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा’ (एम्.एच्.-सेट) विभागावर ही प्रश्नपत्रिका सिद्ध करण्याचे दायित्व देण्यात आले होते; मात्र त्यामध्ये परीक्षा यंत्रणेतून ‘कॉपी पेस्ट’ झाल्याचा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. (यावरून परीक्षा मंडळाचा आंधळा कारभार कसा चालतो ? हे दिसून येते ! – संपादक) परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्यानंतर ही प्रश्नपत्रिका ‘सेट २०१९’च्या प्रश्नपत्रिकेसारखी असल्याचे निदर्शनास आले.