विलेपार्ले (मुंबई) गोमंतक सेवा संघ येथे ‘गोवा मुक्ती दिन’ साजरा !

मुंबई – विलेपार्ले येथील गोमंतक सेवा संघ संस्थेच्या सभागृहात १९ डिसेंबर या दिवशी ‘गोवा मुक्तीदिन’ साजरा करण्यात आला. ‘आमीं गोंयकर’ संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मानद अध्यक्ष सी.ए. मोहन संझगिरी यांनी त्यांच्या प्रास्ताविकात गोमंतक सेवा संघ, धी गोवा हिंदु असोसिएशन, मुंबई गोमंतक मराठा समाज आदी गोमंतकीय संस्थांच्या एकत्रित सहभागासाठी ‘आमीं गोंयकर’च्या वतीने आभार मानले. या वेळी अधिवक्ता बाळ देसाई यांनी ‘गोवा इन्क्विझिशन – पोर्तुगीजांनी गोव्यातील हिंदूंवर केलेल्या अत्याचाराची परिसीमा !’ या विषयावर भाष्य केले. मेजर (निवृत्त) अरुण शिरसीकर यांनी त्यांच्या सैनिकी जीवनातील अनुभव कथन केले. त्यानंतर गोंयकर कलावंतांनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अलका केरकर यांनी आणि आभारप्रदर्शन सागर सावर्डेकर यांनी केले.