कोल्हापूर – गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी घाऊक आणि किरकोळ वस्तूंची बाजारपेठ आहे. येथे ८ दिवसांपूर्वी गुटखा विक्रेत्यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या एका पदाधिकार्यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यामुळे गांधीनगर हे मावा, गुटखा, बनावट मद्य यांचे मुख्य केंद्र आहे का ? असेल, तर बंदी घातलेला गुटखा राजरोसपणे गांधीनगर येथे कसा मिळतो ? याचा शोध प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. तरी गुटखा विक्रेत्यांची कार्यशाळा घेणार्या अधिकार्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकारी प्र.प्र. फावडे यांना दिले. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
या संदर्भात श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘संबंधित अधिकार्यास उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आम्ही एक हार भेट दिला आहे. तो घालून प्रशासनाने त्याचा जाहीर सत्कार करावा, तसेच बैठक घेणार्या संबंधित अधिकार्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’