विषबाधा होऊन २३ मेंढ्यांचा मृत्यू !
हिंगोली – येथे विषारी चार्यातून विषबाधा झाल्याने मेंढपाळांच्या २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये लाखो रुपयांची हानी झाली आहे. एकूण ४० मेंढ्यांना विषबाधा झाली आहे. उपचाराची कुठलीच सुविधा नसल्याने मेंढ्या विषबाधेने तडफडत होत्या.
वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी मुलाकडून अपहरणाचा बनाव !
पैशांसाठी कोणत्याही थराला जाणारी युवा पिढी !
पालघर – २० वर्षीय मुलाने आपल्या वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. मुलाने ३० सहस्र रुपयांची खंडणी अपरहरणकर्ते मागत असल्याचे सांगितले. अधिक अन्वेषणानंतर हा प्रकार उघड झाला.
घराचे आमीष दाखवून फसवणारा विकासक अटकेत !
अशांकडून लुबाडलेला सर्व पैसा जप्त करायला हवा !
मुंबई – नवीन प्रकल्पातील घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीकडून मोठी रक्कम घेऊन फसवणूक करणार्या विकासकाला पंतनगर पोलिसांनी अटक केली. नीरज वेद (वय ५४ वर्षे) असे विकासकाचे नाव असून तो घाटकोपरमधील रहिवासी आहे. तक्रारकर्त्याकडून वेद याने ४६ लाख रुपये घेतले होते. त्याने अशी अनेकांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात १० गुन्ह्यांची नोंद आहे.
नैना प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांचे बेमुदत उपोषण चालूच !
पनवेल – नैना प्रकल्पाच्या विरोधात पनवेल तालुक्यातील तुरमाळे गावात सलग ६ व्या दिवशी बेमुदत उपोषण चालूच ठेवण्यात आले. सिडकोविरोधात घोषणा देत स्थानिकांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवला. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यात ७ शेतकरी उपोषणासाठी बसले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.