नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात बालमृत्यूचे प्रमाण अधिक असून आरोग्य यंत्रणा सक्षम असतांना बालमृत्यूचे प्रमाण अल्प का होत नाही ? अशी लक्षवेधी सूचना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उपस्थित केली. यावर बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली. ‘वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यात ६ सहस्र ९६६ बालमृत्यू झाले. वर्ष २०२३-२४ मध्ये आतापर्यंत ४ सहस्र ८७२ बालकांचा मृत्यू झाला आहे. याविषयी ‘बालमृत्यू रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील’, असे आश्वासन डॉ. तानाजी सावंत यांनी सभागृहात दिले.