शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

नाशिक – जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या हानीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार या तळेगाव रोही येथे आल्या होत्या. त्या वेळी त्यांच्यासमोरच जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील रामदास केदार शेतकर्‍याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे परिसरात गोंधळ झाला.