नवी देहली – उत्तरकाशी (उत्तराखंड) येथील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ कामगारांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर या बोगद्याचे काम थांबवण्यात आले आहे. या बोगद्याच्या कामाचे परीक्षण केल्यानंतर काम चालू करण्यात येणार आहे. हा बोगदा १२ सहस्र कोटी रुपयांच्या ‘चार धाम ऑल वेदर रोड प्रोजेक्ट’चा महत्त्वाचा भाग आहे.