नाशिक येथे भीषण आगीत ५ ते ६ दुकाने जळून खाक

प्रतिकात्मक चित्र

नाशिक – येथील एम्.जी. रोड परिसरात मध्‍यरात्री भीषण आग लागली. यात ५ ते ६ दुकाने जळून खाक झाली. अग्‍नीशमनदलाच्‍या जवानांकडून आग विझवण्‍यासाठी प्रयत्न चालू होते. आग लागण्‍यामागील कारण समजू शकलेले नाही. अग्‍नीशमनदलाचे १५ बंब घटनास्‍थळी आले होते.