‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्‍वती (टेेंब्‍ये) स्‍वामी महाराज प्रबोधिनी’च्‍या १९ व्‍या वार्षिक उत्‍सवाची यशस्‍वी सांगता !

‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्‍वती (टेेंब्‍ये) स्‍वामी महाराज

कोल्‍हापूर – प.प. श्रीवासुदेवानंद सरस्‍वती (टेंब्‍ये) स्‍वामी महाराज यांचे वाङ्‍मय आणि लेखनआशय हा समाजात संस्‍कार, सुजाणता, सुशिक्षितता, प्रखर देवभक्‍ती-राष्‍ट्रभक्‍ती जागवणारा आहे. या लेखनाच्‍या परिशीलनाने आणि चिंतनाने देशाची, समाजाची सर्वांगीण उन्‍नती शक्‍य आहे. हाच ‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्‍वती (टेेंब्‍ये) स्‍वामी महाराज प्रबोधिनी’चा मुख्‍य उद्देश आहे, असे प्रतिपादन प्रबोधिनीचे सदस्‍य श्री. नितीन देशपांडे यांनी केले. ते ५ नोव्‍हेंबर या दिवशी प्रबोधिनीच्‍या समारोपीय सत्रात बोलत होते.

या प्रसंगी प्रबोधिनीचे डॉ. सुरेश देशपांडे, श्री. दिगंबर जोशी, वेदमूर्ती सुहास जोशी, अधिवक्‍ता केदार मुनीश्‍वर, डॉ. प्रदीप तराणेकर यांसह उपस्‍थित होते. या वेळी मोठ्या संख्‍येने साधक आणि अभ्‍यासक उपस्‍थित होते.