कोणत्‍याही सोहळ्‍यात प्रेक्षकांसमवेतच व्‍यासपिठावर बसलेल्‍या मान्‍यवरांनाही नमस्‍कार करणे अपेक्षित असणे

साधक आणि धर्मप्रेमी यांना सूचना

नुकताच एक संतसन्‍मान सोहळा झाला. या सोहळ्‍यात साधक साधना करून संतपदावर आरूढ झाल्‍याची घोषणा होण्‍यापूर्वी आणि घोषणा झाल्‍यानंतर साधक त्‍या संतांची गुणवैशिष्‍ट्ये सांगण्‍यासाठी व्‍यासपिठावर आले; परंतु परत आपल्‍या जागेवर जातांना काही साधकांनी व्‍यासपिठावर बसलेल्‍या मान्‍यवरांना नमस्‍कार किंवा अभिवादन न करता केवळ समोर बसलेल्‍या प्रेक्षकांनाच नमस्‍कार केला. प्रेक्षकांसमवेतच व्‍यासपिठावर बसलेल्‍या मान्‍यवरांनाही नमस्‍कार करणे अपेक्षित असते. कोणत्‍याही कार्यक्रमात अथवा समारंभात व्‍यासपिठावर जाऊन साधक काही सूत्रे सांगतात. त्‍या वेळी प्रथम व्‍यासपिठावरील मान्‍यवरांना, तसेच समोर बसलेल्‍या श्रोत्‍यांना नमस्‍कार करावा. त्‍याचप्रमाणे भाषण किंवा सूत्रे सांगून झाल्‍यावर परत जातांना श्रोत्‍यांप्रमाणेच व्‍यासपिठावरील मान्‍यवरांनाही नमस्‍कार करावा.