ठाणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीजयंत्रणेचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करून २४ घंटे अखंड वीजपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी ४ सहस्र ५०० कोटी रुपयांचा आराखडा करण्यात येत आहे. या आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के अनुदान दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाणे येथे दिली. जिल्हा विद्युत् समितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
(सौजन्य : ABP MAJHA)
‘या आराखड्यात अन्य लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल’, असे निर्देश पाटील यांनी दिले.