पनवेल – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत केला आहे; परंतु अद्याप केंद्राकडे हा ठराव पाठवून संमत करून घेण्यात आलेला नाही. ही संमती मिळावी यासाठी ‘विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती’ने ९ ऑगस्ट या दिवशी विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तरघर, उलवे आणि चिंचपाडा येथील ३ प्रमुख मार्गांवर नामफलक लावले. हे नामकरण करण्यास वेळ लागल्यास ११ ऑक्टोबर या दिवशी मोठा मोर्चा काढण्याची चेतावणीही कृती समितीने दिली आहे.