कला दिग्‍दर्शक नितीन देसाई यांच्‍या आत्‍महत्‍या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

खालापूर – नितीन देसाई यांच्‍या आत्‍महत्‍या प्रकरणी त्‍यांची पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. त्‍या तक्रारीच्‍या आधारे इ.सी.एल्. फायनान्‍स आस्‍थापन आणि एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण ५ जणांविरोधात कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद झाला आहे.