सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री !

  • डी.के शिवकुमार उपमुख्यमंत्री !

  • बेंगळुरूत उद्या सरकारचा शपथविधी !

सिद्धरामय्या

नवी देहली – चार दिवसांच्या मनधरणीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असून सिद्धरामय्या हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. डी.के. शिवकुमार यांनी सध्या तरी उपमुख्यमंत्री पदावर समाधान व्यक्त केले आहे. सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनंतर शिवकुमार यांनी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री असतील, तर पुढील अडीच वर्षे शिवकुमार मुख्यमंत्री पद भूषवतील.

१. शिवकुमार म्हणाले, मी पक्षाच्या सूत्राशी सहमत आहे. पुढे लोकसभेच्या निवडणुका असून त्याचे मी दायित्व घेण्यास सिद्ध आहे.

२. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा २० मे या दिवशी बेंगळुरू येथे होणार आहे.