सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर परभणी येथील सौ. मनीषा पिंपळे यांना आलेल्या अनुभूती

१. त्रासदायक अनुभूती

सौ. मनीषा पिंपळे

अ. ‘एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून त्यांच्याशी बोलत होते. तेव्हा माझा केवळ श्वास चालू होता आणि ‘पूर्ण घर अन् मी गोल गोल फिरत आहे’, असे मला जाणवले.

आ. त्या क्षणी मला ‘हातातील छायाचित्र ठेवून द्यावे’, असे वाटत होते.

२. ‘छायाचित्रातील चैतन्य सहन होऊ दे’, अशी प्रार्थना होणे

अ. गुरुदेवांचे छायाचित्र पहात असतांना माझ्या मनात ‘गुरुदेव, मला तुमच्या छायाचित्रातील चैतन्य सहन होऊ दे’, अशी प्रार्थना होऊ लागली.

आ. प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र मला वेगळेच जाणवत होते. मी गुरुदेवांना सूक्ष्मातून म्हणाले, ‘तुम्हाला पहात असतांना मला कोणताही त्रास झाला, तरी चालेल; परंतु मी हे छायाचित्र सोडून जाणार नाही. मला यातील चैतन्य सहन होऊ दे.’

३. गुरुदेवांच्या छायाचित्राशी बोलत असतांना साधिकेला त्यांची विविध रंगांतील वेगवेगळी चैतन्यमय रूपेही दिसणे

मी त्या छायाचित्राकडे पहात होते. त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांची वेगवेगळी रूपे दिसली. मला काही वेळा पांढरा शुभ्र, कधी निळसर, तर कधी गुलाबी रंगात त्यांची वेगवेगळी चैतन्यमय रूपेही दिसत होती. ती रूपे पाहून माझा नामजप चालू झाला. मला गुरुदेवांचे गुलाबी रूप दिसले, तेव्हा ‘ते नवजात अर्भकाप्रमाणे कोवळे रूप असावे’, तसे दिसत होते.

४. वाढदिवसाच्या दिवशी साधकांमध्ये गुरुदेवांची वेगवेगळी रूपे पहायला मिळणे

माझ्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री मला गुरुदेवांचे विविध रूपांत दर्शन झाले. त्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला साधकांमध्ये गुरुदेवांची वेगवेगळी रूपे पहायला मिळत होती.

मला एवढी मोठी अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. मनीषा पिंपळे, परभणी (१.९.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक