वणी (यवतमाळ) येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’चे आयोजन !
वणी (यवतमाळ), ७ एप्रिल (वार्ता.) – ज्यांच्याविषयी बाळ गंगाधर टिळकांनी म्हटले, ‘विनायकाच्या रूपात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आहे. महात्मा गांधींनी म्हटले होते की, त्यांचा आणि आमचा मार्ग वेगळा आहे; मात्र देशभक्ती एकच आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला. अंधार कोठडीत कोलू चालवत हातांत कड्या आणि पायांत बेड्या असतांना कोळशाने भिंतीवर ६ सहस्र कविता लिहिल्या अन् त्या स्मरणात ठेवल्या. एवढी कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्यांशी हा बालबुद्धीवाला स्वतःची तुलना करतो ? असे विधान नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्याविषयी केले. येथे काढण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’च्या समारोपाच्या वेळी हिंदुप्रेमींना व्यासपिठावरून संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंदुप्रेमींनी गजबजलेला होता.