मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली उपवनसंरक्षकांची भेट !
ठाणे, २८ मार्च (वार्ता.) – मुंब्रा डोंगरावर अनधिकृत दर्गे उभारल्याचे शहरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी उघड केल्यावर वन विभाग खडबडून जागे झाले आहे. मुंब्रा डोंगरावर असलेल्या अनधिकृत बांधकामांची वन विभागाकडून पाहणी करण्यात आली; मात्र ‘मशीद आणि दर्गे यांचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करण्यात यावी’, यावर मनसे ठाम असून डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात यावीत, यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि मनसैनिक यांच्या शिष्टमंडळाने २७ मार्चला उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांची भेट घेतली.
या भेटीनंतर वनाधिकार्यानी ‘मुंब्रा डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येईल’, असे आश्वासन मोरे यांना दिले.