सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगानंतर सनातनच्‍या ११९ व्‍या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे) यांच्‍या चेहर्‍यात झालेला वैशिष्‍ट्यपूर्ण पालट !

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार
श्री. अमित डगवार

‘पू. आई (पू.(श्रीमती) मंदाकिनी डगवार – सनातनच्‍या ११९ व्‍या संत) रामनाथी आश्रमात आल्‍यावर एकदा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगाला उपस्‍थित होती. सत्‍संगानंतर तिला तिच्‍या चेहर्‍यात पालट जाणवला. पू. आईने सत्‍संगाहून आल्‍यानंतर स्‍वतःचे छायाचित्र काढून पाहिले. त्‍या छायाचित्रामध्‍ये तिला तिच्‍या चेहर्‍याभोवती प्रभावळ दिसत होती. तिचा चेहरा तेजस्‍वी दिसत होता. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले प्रत्‍येक सत्‍संगामध्‍ये तिला साधनेच्‍या पुढच्‍या टप्‍प्‍याला नेत आहेत’, असे तिला सत्‍संगानंतर वाटत होते. ‘स्‍वतःच्‍या छायाचित्रामध्‍येही अशा प्रकारे पालट जाणवतो का ?’, याच्‍या अभ्‍यासासाठी हे छायाचित्र तिने काढले होते.’

– श्री. अमित डगवार (पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा मुलगा) पाटणतळी, फोंडा, गोवा.  (१६.७.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक