तापाची लक्षणे असूनही तापमापकाने ताप न दाखवणे आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍याने २ दिवसांत बरे वाटणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘पितृपक्षात १७.९.२०२२ या दिवशी सकाळी मी झोपेतून उठल्‍यावर ‘मला पुष्‍कळ ताप आहे’, असे मला वाटले. त्‍या वेळी मला ‘अंग थरथरणे, प्राणशक्‍ती न्‍यून होणे, तोंडामध्‍ये कडवटपणा जाणवणे, डोळ्‍यांमध्‍ये पुष्‍कळ आग होणे आणि ‘अंग पुष्‍कळ तापले आहे’, असे जाणवणे’, हे त्रास होत होते. माझ्‍या अंगातून गरम वाफा निघत होत्‍या; पण तापमापकाने (थर्मामीटरने) ताप मोजल्‍यावर तो ९७ अंश फॅरनहाईट एवढाच ताप दाखवत होता. वैद्यांना संपर्क केल्‍यावर त्‍यांनी सांगितले, ‘‘ही ताप येण्‍याची लक्षणे आहेत.’’ त्‍या कालावधीत माझ्‍या रक्‍तातील साखरेची पातळी २७९ मिलीग्रॅम प्रती डेसीलिटर एवढी वाढली होती. (‘निरोगी व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तातील साखरेची सर्वसाधारण पातळी ९० ते १०० मिलीग्रॅम प्रती डेसीलिटर, एवढी असते.’) अशक्‍तपणा आल्‍यामुळे मला २ पावले चालणेही कठीण झाले होते.

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

माझी ही स्‍थिती येण्‍याच्‍या ४ दिवस आधीपासून ‘मला ताप येणार आहे आणि माझे शरीर ताप न येण्‍यासाठी संघर्ष करत आहे’, असे मला जाणवत होते. मला तापाची सर्व लक्षणे आणि त्रास होत असूनही तापमापक ताप दाखवत नव्‍हता. ‘यामागे आध्‍यात्‍मिक कारण असू शकते’, असे मला वाटले; म्‍हणून मी याविषयी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना विचारल्‍यावर त्‍यांनी मला ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप करायला सांगितला. ‘त्‍यांनी सांगितलेले नामजपादी उपाय आणि औषधोपचार यांमुळे मी २ दिवसांत बरी झाले’, त्‍याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (पू.) श्रीमती मंदाकिनी डगवार, पाटणतळी, फोंडा, गोवा. (२२.९.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक