विमापत्रधारकांची गुंतवणूक सुरक्षित ! – आयुर्विमा महामंडळाचा दिलासा

आयुर्विमा महामंडळाच्या अदानी समूहातील गुंतवणुकीमुळे साशंकता निर्माण झाल्याचे प्रकरण

एल्.आय.सी.चे अध्यक्ष एम्.आर्. कुमार

नवी देहली – आयुर्विमा महामंडळाचे (एल्.आय.सी.चे) विमाधारक आणि समभागधारक यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांच्यासाठी १ टक्काही जोखीम नाही. त्यांच्या गुंतवणुकीवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या संदर्भात निश्चिंत रहावे. त्यांची गुंतवणूक सुरक्षित आहे, अशा शब्दांत एल्.आय.सी.चे अध्यक्ष एम्.आर्. कुमार यांनी एल्.आय.सी.च्या गुंतवणूकदारांना दिलासा दिला. ते ‘बिझनेस टुडे’ नियतकालिकाच्या प्रतिनिधीशी बोलत होते.

अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अहवालानंतर अदानी समूहाच्या ‘शेअर्स’मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. याच समूहाला एल्.आय.सी.ने मोठ्या प्रमाणात कर्ज दिले आहे. त्यामुळे एल्.आय.सी.च्या कोट्यवधी ग्राहकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कुमार यांनी गुंतवणूकदारांना वरील दिलासा दिला.

एल्.आय.सी.ची अदानी समूहात सहस्रो-कोटी रुपयांची गुंतवणूक

डिसेंबर २०२२ पर्यंत एल्.आय.सी.ने अदानी समूहात ३३ सहस्र ९१७ सहस्र कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.