१. कार्यालयाची किल्ली हरवल्याचे लक्षात आल्यावर मनात अनेक विचार येत असतांना सतत डोळ्यांसमोर एक ठिकाण दिसणे : ‘६.७.२०२२ या दिवशी सकाळी साडेदहा वाजता मी नवी मुंबई येथील एका रेल्वेस्थानकाच्या जवळून कार्यालयात जातांना पुष्कळ पाऊस पडत होता. त्या वेळी मी छत्री उघडण्याचा प्रयत्न करत असूनही छत्री उघडली जात नव्हती. त्या गडबडीत माझ्याकडून कार्यालयाची किल्ली कुठेतरी पडली; पण तेव्हा माझ्या ते लक्षात आले नाही. कार्यालयाच्या दाराच्या बाहेर उभी राहून कुलूप उघडायचे असतांना ‘माझ्याकडे किल्ली नाही. किल्ली हरवली आहे’, हे माझ्या लक्षात आले. मी माझी संपूर्ण ‘पर्स’ शोधली; पण मला किल्ली मिळाली नाही. त्या वेळी ‘त्या मार्गावर पुन्हा जा. किल्ली मिळेल’, असा विचार माझ्या मनात येत होता, तसेच त्या वेळी माझ्या मनात अन्य नकारात्मक विचारही येत होते. मी ‘पर्स’मध्ये किल्ली शोधण्यात वेळ घालवला. त्या वेळी मला सतत डोळ्यांसमोर एक ठिकाण दिसत होते.
२. मी पावसातच किल्ली शोधायला निघाले. तेव्हा रेल्वेस्थानकाजवळील एका पटलावर मला किल्ली दिसली. खरेतर त्या पटलाजवळ मी गेले नव्हते. मला ‘इतक्या लगेच किल्ली सापडेल’, असे वाटले नव्हते.
३. ‘ईश्वराच्या सान्निध्यात असतांना अशक्य गोष्टही शक्य होते’, हे माझ्या लक्षात आले. हा प्रसंग घडत असतांना मी नामजप करत होते. मला कुलदेवी आणि श्रीकृष्ण यांचे स्मरण होत होते. ‘देवानेच तिथे किल्ली ठेवली’, असे मला वाटले.
मी ईश्वराच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. कामिनी लोकरे, ठाणे, महाराष्ट्र. (६.७.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |